अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 27 जुलै : महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. आता याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योग रत्न पुरस्कार सुरू करणार आहे. याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर देखील करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. कसं असणार स्वरुप? महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1997 मध्ये महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना हा पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यासाठी 31 जानेवारी 2023 पासून या पुरस्काराच्या मानधनाची रक्कम 10 लाखांवरून 25 लाख रु. करण्यात आली. 2012 पूर्वी 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते. परंतु, सप्टेंबर, 2012 मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले. तसेच पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्यात आली. आता परत शासनामार्फत या पुरस्काराच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. 2015 ला बाबासाहेब पुरंदरेंना हा सन्मान मिळाल्यानंतर हा पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तर यंदा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, उद्योग रत्न पुरस्काराचे स्वरुप कसे असेल? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. ‘पुरस्कार वापसी’ रोखण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीच्या संसदीय समितीने सोमवारी संसदेत ‘राष्ट्रीय अकादमी आणि इतर सांस्कृतिक संस्थांचे कार्य’ या शीर्षकाचा अहवाल सादर केला. वायएसआरसीपीचे विजय साई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सांगितले की, “समितीने असे सुचवले आहे की जेव्हा जेव्हा एखादा पुरस्कार दिला जातो, तेव्हा प्राप्तकर्त्याची संमती घेतली पाहिजे, जेणेकरून तो राजकीय कारणांसाठी तो परत करू नये. कारण ती देशाच्या अनादराची बाब आहे. समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये डॉ. सोनल मान सिंग, मनोज तिवारी, छेडी पहलवान, दिनेश लाल यादव ‘निरहुआ’, तीरथ सिंग रावत, रजनी पाटील, तापीर गाओ आणि राजीव प्रताप रुडी यांचा समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.