मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड, 5 दिवसात झाला 1000 मिमी पाऊस


मुंबई, 27 जुलै : मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलंय. या पावसामुळे शहरातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबईतील
जुलै महिन्यातल्या पावसाचा रेकॉर्ड यंदा मोडीत काढला असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे 124.8 मिमी आणि 124 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. चर्चगेट, मरीन लाइन्समध्ये रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. दादर, माटुंगा, किंगसर्कल, लालबाग, अंधेरी, कुर्ला आदी ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पाण्याच्या निचऱ्यासाठी काम करत आहेत. सततच्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

News18लोकमत


News18लोकमत

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईतील अतिवृष्टीने जुलै 2020 मधील 1,502.6 मिमीचा विक्रम मोडला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत एकूण 1512.7 मिमी पाऊस झाला असून, यंदाच्या जुलै महिन्यात पावसाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.  जुलै 2005 मध्ये एकूण 1454.4 मिमी पाऊस पडला होता.  या महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 58 मिमी कमी आहे.
नागपूरमधल्या पावसानं मोडला 29 वर्षांचा रेकॉर्ड, 24 तासांमध्ये रस्त्यांना आलं नद्यांचं स्वरुप, Video
दरम्यान, 25 जूनपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत महिनाभरात मुंबईत 2000 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात 21 जुलैपर्यंत प्रथमच 1,000 मिमी आणि त्यानंतर पाच दिवसांत 1,000 मिमी पावसाची नोंद झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *