[ad_1]
मुंबई, 26 जुलै : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचे पहिला भाग आज तर दुसरा भाग उद्या प्रसारित करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या पहिल्या भागातून उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर मनसेनं निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मुलाखतीचं विडंबन करत एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये मनसेचे आणखी एक नेते संतोष धुरी संजय राऊत यांची नक्कल करत आहेत, तर संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री केली आहे.
आवाज कुणाचा एक मुलाखत pic.twitter.com/GU5YZ8BqqN
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2023
संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्राच्या माजी नंबर वन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं लिहिण्यात आलं आहे. आवाज कुणाचा, एक मुलाखत असं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी या व्हिडिओला दिलं आहे.
शिवसेना, हिंदुत्व, सत्ता, राष्ट्रवादी अन् बरंच काही; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 10 मुद्दे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link