अशी लग्नपत्रिका कधी पाहिली नसेल, मुंबईकर स्मृतीची भन्नाट आयडिया

[ad_1]

मुंबई, 25 जुलै : लगीनघाई हा आपल्याकडे मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या तयारीत खरं तर न उतरलेलं बरं.. कारण लग्नवार्ता जेव्हा इतरांपर्यंत पोहोचते तेव्हा ती खरी लग्नाची सुरुवात म्हणायला हवी. आणि त्यासाठी आजही आपल्याकडे महत्त्वाची ठरते ती लग्नपत्रिका. सध्या या लग्नपत्रिकांचं स्वरूपही बदलत चाललं असून ते अधिक आकर्षक, पर्यावरणपूरक, कमीत कमी किमतीत अशा वेगवेगळ्या पत्रिकांपासून डिजिटल झालेल्या तरुणाईसाठी खास डिजिटल स्वरूपातही पत्रिका घराघरांत पोहोचत आहेत. लग्नपत्रिकांचं हे बदलतं रूप सध्या चर्चेचा विषय ठरतं असून
मुंबईतील
  स्मृती पोळ डिजिटल आर्ट पत्रिकाची निर्मिती करत आहे. विविध प्रकारच्या पत्रिका  काळ बदलत असला तरी अद्यापही आपल्याकडे लग्नपत्रिकांची छपाई मोठय़ा प्रमाणावर केली जाते. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही देशभर कायम आहे. त्यामुळे लग्नपत्रिका हवीच मात्र त्यांचं स्वरूप खूप वेगाने बदलतं आहे. त्या त्या जोडप्यांच्या विचारांचा, व्यवसायाचा आणि कल्पकतेचाही परिणाम या पत्रिकांवर दिसून येतो. लग्नाची अशीच हटके लग्नपत्रिका छापणारी तरुणी सध्या सोशल माध्यमांवर चर्चेत आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारी स्मृती अक्षय चव्हाण पोळ ही आपल्या डिजिटल आर्टच्या माध्यमातून ट्रेंडिंग लग्नपत्रिका, डोहाळे जेवण निमंत्रण, निमंत्रण पत्रिका, वाढदिवसाचे निमंत्रण, असे विविध प्रकारच्या पत्रिका तयार करते.

News18लोकमत


News18लोकमत

कशी झाली सुरुवात? स्मृती पोळ सांगते की, कोरोनाच्या काळात नोकरी गमावल्यामुळे याच काळात स्वतःच्या अंगीकृत असलेल्या कलेवर काम करत डिजिटल आर्टमध्ये असलेला रस आणि आर्ट बद्दलची अधिक माहिती घेऊन शिक्षण पूर्ण करून कौशल्य पूर्ण केलं. आणि याच कौशल्याच्या मदतीने सध्या डिजिटल पत्रिका तयार करत आहे. याची किंमत देखील हजार रुपये पासून सुरुवात होऊन तुम्ही ज्या प्रकारे ही पत्रिका कस्टमाईज कराल त्याप्रमाणे याची किंमत देखील ठरते. स्वतःचं लग्न असल्यामुळे घरच्यांना सांगितलं होतं की पारंपारिक लग्नपत्रिका तयार करायची नसून मला काहीतरी वेगळं हवं आहे. आणि हे वेगळं काहीतरी करण्याच्या भानगडीत डिजिटल आर्टच्या माध्यमातून भन्नाट अशी स्वतःच्या लग्नाची लग्न पत्रिका तयार केली. आणि याचा छोटासा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला असता बघता बघता काही दिवसातच या व्हिडिओला नेटकरांनी मिलियनच्या वर प्रतिसाद दिला. ही भन्नाट संकल्पना पाहून मला बऱ्याच जणांची विचारणा आली आणि खऱ्या अर्थाने डिजिटल पत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेला इथूनच सुरुवात झाली, असं स्मृती पोळ सांगते.

चिकनकारी साड्यांची करायचीय खरेदी? पुण्यातील या मार्केटला द्या भेट

लोकांचं आकर्षण डिजिटल लग्नपत्रिकेकडे ही लग्नपत्रिका तयार करताना मराठी संस्कृती जपत आणि आत्ताच्या संस्कृती प्रमाणे त्याला थोडासा टच देऊन ही लग्नपत्रिका तयार केली जाते. सध्या पारंपारिक लग्नपत्रिका किंवा पत्रिकेच्या तुलनेत लोकांचं आकर्षण हे डिजिटल लग्नपत्रिकेकडे वाढलेलं पाहायला मिळते. आपल्याला हवी तशी कस्टमर पद्धतीने लग्नपत्रिका तयार करून लोक वेगवेगळ्या भन्नाट संकल्पनेसह ती तयार करून घेत असतात, असं ही स्मृतीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *