[ad_1]
मुंब्रा, 25 जुलै : लग्नाला नकार दिल्यामुळे एका माथेफिरू तरुणाने विवाहितेसह तिच्या कुटुंबीयांवर चाकूने हल्ला केला आहे. ही घटना मुंब्रा परिसरातील आलिशान चित्रपटगृहाजवळ घडली. हल्ल्याची ही थरारक घटना एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर आरोपी फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ला झालेल्या दाम्पत्याने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोराने महिलेसह तिच्या पतीवरही धारदार चाकूने वार केले. तबस्सुम शेख आणि आरोपी फरमान निसार शेख एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते, या दोघांचं लग्नही ठरलं होतं, पण आरोपी फरमान व्यसनाधीन असल्यामुळे तबस्सुमने त्याच्यासोबत लग्न करायला नकार दिला. यानंतर मार्च 2022 मध्ये तबस्सुमचं लग्न इश्तियाक शेख नावाच्या दुसऱ्या मुलासोबत झालं.
लग्नाला नकार दिला म्हणून माथेफिरूचा जोडप्यावर धारदार चाकूने हल्ला, घटनेचं थरारक सीसीटीव्ही#Mumbra #CCTV pic.twitter.com/FyWisO2A6A
— News18Lokmat (@News18lokmat) July 25, 2023
दीड वर्षानंतर 21 जुलैला तबस्सुम पतीसोबत आधार कार्ड घेण्यासाठी तिच्या माहेरी आली, तेव्हा फरमान तिथे आला आणि त्याने चाकूने तबस्सूमवर हल्ला केला. तू माझ्यासोबतचं लग्न मोडून खूप मोठी चूक केली आहेस, आता बघ मी काय करतो, अशी धमकी फरमानने दिली. यानंतर तबस्सुम किंचाळायला लागली तेव्हा तिचा पती इश्तियाक तिथे आला. इश्तियाकने फरमानला समजवण्याचा प्रयत्न केला, पण फरमानने तबस्सुमच्या पतीवही हल्ला केला. एवढच नाही तर फरमानने इश्तियाकला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू माझी झाली नाहीस तर आणखी कुणाचीही होऊ शकत नाहीस, मी तुला सोडणार नाही,’ अशी धमकी देत फरमानने तबस्सुम आणि तिच्या नवऱ्यावर धारदार चाकूने वार केले. याप्रकरणी तबस्सुम आणि तिच्या नवऱ्याने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरमानचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link