नदीवर पूल नाही, पालघरमध्ये गर्भवतीला फळीच्या मदतीने नेले रुग्णालयात; VIDEO VIRAL

[ad_1]

राहुल पाटील, प्रतिनिधी, पालघर, 25 जुलै : जिल्ह्याच्या जव्हार , मोखाडा, विक्रमगड या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि नद्यांवर पूल नसल्याने नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याच वारंवार उघड होतंय . मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकांना नदीतील वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याच धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाल आहे. कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय . या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा अधिक आहे . मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत असून या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीआधीच वातावरण तापलं; लोक उत्सुक आहेत.., भाजपचा टोमणा
पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहत असून या काळात गावात शिक्षक ही पोहोचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. काल एका गरोदर मातेला अचानक उलट्या होऊ लागल्याने तिला आधी डोलीतून नंतर लाकडी फळीवर नदी पार करावी लागली या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ नंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याच चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा , आंबे पाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांना गावा बाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे . पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत . त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय . मुंबई ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघडत होत असून सरकार याची दखल कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय . पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील विकासकामा आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी सरकारकडून शेकडो कोटींचा निधी दिला जात असला तरी हा निधी पूर्ण खर्च न केल्याने मागील अनेक वर्षांपासून आर्थिक वर्षानंतर पुन्हा सरकार जमा केला जातोय . मात्र जिल्ह्यात असलेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामुळे आजही येथील गावकडे हे मूलभूत सोयी सुविधा रस्ते यांच्यापासून वंचित आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *