[ad_1]
रत्नागिरी, 25 जुलै, चंद्रकांत बनकर : राज्याच्या अनेक भागांत सध्या संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीनं आज सकळी सात वाजता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पणीपातळी 7.45 मीटर एवढी आहे. या नदीची धोका पातळी सात मीटर आहे. म्हणजेच नदीत सध्या धोका पातळीपेक्षाही अधिक पाणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुकानं पाण्याखाली जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. मटन-मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलं आहे. सात ते आठ दुकानं पाण्याखाली गेली आहेत. खेडमधील खाडीपट्ट्या विभागात जाणारे तसेच नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आता पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेडच्या बाजारपेठेतही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड नगर प्रशासनाने तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीच्या किनाऱ्यावर कुणीही जाऊ नये अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Weather Update : आज पुणे-मुंबईत मुसळधार पाऊस, या 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
आजचा हवामान अंदाज दरम्यान आज राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सातही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, आणि सिंधूदूर्गमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link