..अन् ‘एनी डेस्कनं’च केली काशी; महिलेला 38 लाखांचा गंडा

[ad_1]

मुंबई, 25 जुलै : मुंबईच्या भांडूपमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका महिलेला तब्बल 38 लाख 83 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की या महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीनं तिकीट बूक केलं, मात्र ते तिकीट तिला मिळालं नाही. त्यामुळे तीनं संबंधित कंपीनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधला. काय आहे नेमका प्रकार? या महिलेनं संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधल्यानंतर पुन्हा एकदा तिला एक कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं तिला तिच्या मोबाईलवर एनी डेस्क नावाचं अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. या महिलेनं आपल्या मोबाईलवर सांगितल्याप्रमाणे एनी डेस्क नावाचं अ‍ॅप डाऊनलोड केलं. याच माध्यमातून ठगानं या महिलीच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर डल्ला मारला. या प्रकरणी संबंधित महिलेनं भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याची माहिती दिली.

Nagpur news : ‘अंगात येतो नागोबा, सापाचं विष टाकतो पिऊन’ भोंदूबाबाच्या स्टिंग ऑपरेशनचा VIDEO व्हायरल

एनी डेस्कनं घेतला मोबाईलचा ताबा दरम्यान या अ‍ॅपच्या माध्यमातून दूरवरचा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल किंवा पीसी सहज हँडल करू शकतो. या महिलेनं हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तिच्या मोबाईलचा ताबा या अ‍ॅपनं घेतला. त्यामुळे तिच्या खात्यामध्ये असलेली रक्कम आपल्या खात्यात ओळती करणे आरोपीला सहज शक्य झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *