[ad_1]
नालासोपारा, 21 जुलै, राजा मयाल : पावसामुळे भाजीपाल्यांचे भाव आधीच वाढत चालले आहे. त्यात काही भाजीविक्रेते ग्राहकांच्या जिवाशी खेळ करु पाहात आहेत. एका विक्रेत्याचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याचा हा किळसवाणा प्रकार तुम्हाला पाहवणार देखील नाही. त्याच्या या प्रकारामुळे गंभीर आजार देखील पसरले जाऊ शकतात. हा व्हिडीओना नालासोपारा पश्चिमेकडील असल्याचं सांगितलं जातंय. येथील नगरपालिका हॉस्पिटल जवळ सेक्रेड हॉर्ट शाळेसमोरील भाजी विक्रेत्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत तुम्ही हे पाहू शकता की भाजीविक्रेता आपल्या हातात भाजी घेऊन ती साचलेल्या पाण्यात धूत आहे. हे पाणी फारच खराब आहे. ते गटाराजवळ असल्यामुळे त्या पाण्यात किती विषाणू असू शकतात याचा आपण अंदाजा देखील लावू शकणार आहे. त्याची अशीच भाजी कोणी विकत घेतली तर त्यामुळे लोक आजारी पडू शकतात.
नालासोपारा पश्चिमेत नगरपालिका हॉस्पिटल जवळ सेक्रेड हार्ट स्कूल समोर भाजीवाला साचलेल्या घाणीच्या पाण्यात भाजीपाला धुत आहे.#nalasoprara #shockingnews #viralvideo #viral pic.twitter.com/70XPO6eFmO
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2023
हा प्रकार जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे. अशा प्रकारचं कृत्य करुन, भाजी विक्रेता हा नागरीकांच्या आरोग्याशी सर्रास खेळत असल्याच उघडं झालं आहे. हा व्हिडीओ आज दुपारी १ च्या दरम्यानचा आहे असं सांगितलं जात आहे. हे भाजी विक्रेते नालासोपारा पश्चिमेकडील स्टेशन जवळील रोटी हॉटेल जवळ भाजी विक्री करत असल्याच समोर आलं आहे. अशा भाजी विक्रेत्यावर कारवाईची मागणी नागरीक करत आहेत.
विक्रेत्यानं गटारीच्या पाण्यात धुतला भाजीपाला, Video पाहून येईल संताप
गटारातील पाण्यात भाजी धुण्याची ही पहिलीच वेळ नाही, या आधी देखील एक भाजीविक्रेता अशाप्रकारचं क्रृत्य करताना कॅमेरात कैद झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link