[ad_1]
रायगड, 21 जुलै : इर्शाळवाडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आणखी दोन मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. आजही या परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मात्र तरीदेखील एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 19 जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही 60 पेक्षा अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
News18लोकमत
आज बचाव कार्याचा दुसरा दिवस आहे. एनडीआरएफचे जवान भर पावसात मातीचा ढिगारा दूर करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. याचदरम्यान आज एकाच जागी दोन मृतदेह आढळल्यानं मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link