monsoon session : विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही? बावनकुळे स्पष्टच बोलले


मुंबई, 21 जुलै तुषार रुपनवार: पावसाळी अधिवेशन सुरू होऊन, एक आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाहीये. विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन सुरू आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं विरोधीपक्ष नेतेपदावर  काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाहीये, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.  नेमकं काय म्हणाले बावनकुळे?   काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे. कोण कुठे जाईल असा त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. विरोधी पक्षामध्ये एकी दिसत नाही. वर्षभरात किती नेते काँग्रेसमध्ये राहातात आणि किती जण पक्ष सोडतात असं त्यांना संशय आहे. पुढच्या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडे किती नेते राहातील हे सांगता येत नाही. माझा कोणावरही डोळा नाही पण त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीला विलंब होत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. इर्शालवाडी दुर्घटनेवरून निशाणा   दरम्यान काल इर्शालवाडीमध्ये दरड कोसळून जी दुर्घटना झाली, त्यावरून देखील बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुर्घटना व्हायला नको पाहिजे होती. संपूर्ण राज्याचा मॅप करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री रस्त्यावर आहेत, घटनास्थळी आहेत. काँग्रेसने राज्यातील अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. काँग्रेसकडून लोकांना कन्फ्यूज करणं सुरू आहे. घटना घडली तिथे काँग्रेस पक्षानं जायला हवं होतं, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *