[ad_1]
उदय जाधव, मुंबई, 21 जुलै : इर्शाळवाडी इथे बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली असून मोठी जीवितहानी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथल्या ग्रामस्थांची घर जमीनदोस्त झाली आहेत. तर काहीजण अजूनही बेपत्ता आहेत. इर्शाळवाडी इथे घडलेल्या घटनेनंतर लालाबाग राजा मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. लालबागाच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपतकालिन सेवा ग्रामस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. इर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली आहे. अनेक जखमी ग्रामस्थांवर उपचार देखील सुरू आहेत.
News18लोकमत
या भीषण दुर्घटनेत जखमी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी मदत घेऊन निघणार आहेत. दोन मोठ्या टेम्पोमधून ही मदत पोहचवली जाणार आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ , ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जिवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. उद्या सकाळी 10 वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून ईर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link