[ad_1]
सिंधुदुर्ग, 21 जुलै, विशाल रेवडेकर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जनजीवन विस्कळीत कणकवली, सावंतवाडी, कुडाळ वैभववाडी तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक राज्य मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. गड नदीच्या पात्रातील पाणी आचरा रस्त्यावर आल्याने कणकवली आचरा मार्ग बंद झाला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra rain : घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच, पुण्यासह या 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट
या जिल्ह्यांना रेड अलर्ट दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याप्रमाणाचे पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, रत्नागिरी आणि सातारा इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसांत हवामान विभागाकडून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link