[ad_1]
रत्नागिरी 21 जुलै : 20 ते 24 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. आजही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. अशात रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी शुक्रवारी 21 जुलै 2023 रोजी देखील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सततच्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण आणि खेड तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिपळूण आणि खेड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) आज शुक्रवारी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सुट्टी जाहीर केली आहे
Thane Rain : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याही ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरीत रस्त्यावर मगरी – चिपळूणमध्ये वाशिष्टी आणि शिव नदीला पूर आल्यानंतर सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. यातून कुठे लोक स्वतःला सांभाळत आहेत, त्यानंतर नवं संकट समोर आलं आहे. पुरामुळे शहरातील विविध भागात मगरी आल्या आहेत. त्यामुळे नवा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे वाशिष्टी नदीला आलेल्या पुराचा परिणाम मगरींवर झाला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मगरीही शहरात वाहून आल्या. ठाणे जिल्ह्यातल्या शाळांनाही सुट्टी – आज ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी 21 जुलै रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहीतल, असे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे गुरूवारीही मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link