राजा मयाल, प्रतिनिधी वसई, 20 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसंच गुरूवारी पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेसेवेवरही परिणाम झाला होता. मुंबईसह आसपासच्या परिसरात सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटनाही घडल्या. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं, वसईमध्ये मात्र गुजराती समाजाच्या महिलांनी गरब्याचा आनंद घेतला. वसई पश्चिमच्या साईनगर भागात गुरूवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिलांनी गुडघाभर पाण्यात गरबा खेळला. दोन दिवसांपासून वसईमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. दिवसभर वसई, विरार, नालासोपारा जलमय झालं होतं.
गुडघाभर पाण्यात वसईतल्या महिलांनी घेतला गरब्याचा आनंद#MumbaiRain #Vasai pic.twitter.com/dbAgYIQZ4r
— News18Lokmat (@News18lokmat) July 20, 2023
संध्याकाळपर्यंत साचलेलं पाणी ओसरलं नव्हतं, शेवटी घरात कंटाळलेल्या महिलांनी साचलेल्या पाण्यात गरबा खेळला. वसईतल्या महिलांचा पावसातील गरब्याचा हा आनंद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :