[ad_1]
पुणे, 20 जुलै : राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. पुढील बारा दिवस राज्यात मुसळधार पवासाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांचा सुधारीत अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार लोणावळा, कर्जत, दापोली, महाबळेश्वर, महाड या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात धुव्वाधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे, तर दुसरीकडे या पावसाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालीये. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट दरम्यान आज राज्यातील लोणावळा, कर्जत, दापोली, महाबळेश्वर, महाड या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link