मुंबईत पावसानं रडवलं, लोकलनं लटकवलं, ठाणे स्थानकावर तुफान गर्दी; VIDEO VIRAL


ठाणे, 19 जुलै : राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज पावसाचा जोर वाढला असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाने दाणादाण उडाली असून लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल विस्कळीत झाल्याने स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळत आहेत. काही मार्गांवर ट्रेन्स उशिरा धावत आहेत तर काही लोकल मार्ग ठप्प आहेत. अंबरनाथ ते सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली होती. लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. लोकल स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून डाऊन दिशेकडे जाणारी आणि अप दिशेकडे येणारी वाहतूक डोंबिवली स्थानकापर्यंतच सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ऑफिसहून घरी निघत असाल तर, मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची लोकल ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट

दरम्यान, ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तुडुंब गर्दी असल्याचं दिसतंय. मुंबईतील बहुतांश स्टेशन्सवर हेच चित्र आहे. तब्बल तीन तासानंतर टिटवाळा इथून कल्याण कडे पहिली गाडी गेली. तर कल्याण कडून सुद्धा कसऱ्या कडे गाडी सोडली.

रेल्वे स्थानकाबाहेर एसटी आणि बस सोडण्याचे आदेश रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी आणि बसेस सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रेल्वे उशीरा धावत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे आदेश दिले. रेल्वे स्थानकाच्या बाहेरून तातडीनं बस आणि एस्टी सेवा सुरु होणार आहे. सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसटीए, भायखळा दादार, घाटकोपर ठाणे स्थानकाच्या बाहेरून सोडणार एसटी व बसेस सोडल्या जातील. यासोबतच चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी व बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, सोबतच याचा परिणाम मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या रोजच्या एक्स्प्रेस ट्रेनवरही झाला आहे. पावसामुळे मुंबई-पुणे अप आणि डाऊन मार्गावरच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे ट्रेन रद्द झाल्यामुळे या नोकरदार वर्गाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. रद्द झालेल्या ट्रेनमध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *