रायगडमध्ये पोलीस स्टेशनच गेलं पाण्याखाली; गुडघाभर पाणी साचल्याने तारांबळ

[ad_1]

प्रमोद पाटील, रायगड 19 जुलै : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहाणार आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. रासायनी पोलीस स्टेशनही पाण्याखाली गेलं आहे. यामुळे रात्रभर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. मागील 48 तास जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रासायनीसह, आपटा भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अशातच मुख्य रस्त्यापासून खोलगट भागात पोलीस स्टेशन असल्याने तिथेही पाणी साचलं. पोलीस स्टेशन, ठाणे अंमलदार कक्ष, आरोपी कोठडी, पोलीस निरीक्षक कक्ष यासह संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं. यानंतर कर्मचाऱ्यांनी महत्वाचं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
Raigad Rain: रायगडला पावसाने झोडपले,सर्वत्र पूर परिस्थिती; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
रायगडला पावसाने झोडपलं – जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. नदीने धोका पातळी ओलांडली असून ती सकाळी सात वाजता 6.50 मीटरवर होती. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.

News18

कर्जत खालापूर परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. ही नदी मौजे लोहप येथे 21.52 मीटरवर वाहत आहे. आपटा,रसायनी परिसरात नदीचं पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाल्याने आपटा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *