उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 18 जुलै : राज्याचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (17 जुलै) सुरू झालं आहे. पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली. उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपात्र करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी विधान भवन सचिव आणि राज्यपालांना निवेदन दिले आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी सभागृहात निलम गोऱ्हे यांच्या अपात्र मागणीवर निपक्ष चर्चा आणि चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर विधान परीषदेचं दिवसभराचं कामकाज संपल्यावर ॲड. अनिल परब आणि निलम गोर्हे आमने सामने आले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Video : जेव्हा उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब समोरासमोर येतात#monsoonsession pic.twitter.com/JfqkHL7GqW
— News18Lokmat (@News18lokmat) July 18, 2023
उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपात्र करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी (17 जुलै) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. नीलम गोऱ्हे यांच्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यांना उपसभापतिपदावरून हटावावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या 40 आमदारांच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे. डॉ. गोऱ्हे यांना पदावरून हटवत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील. महाविकास आघाडीच्या आगामी बैठकीत यावर रणनीती आखण्यात येईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले. वाचा –
विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, बंगळुरूमधून उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात परब आणि गोऱ्हे यांच्यात काय झाली चर्चा? विधान परीषदेचं दिवसभराचं कामकाज संपल्यावर ॲड. अनिल परब आणि निलम गोर्हे आमने सामने आले. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यावेळी विरोधी पक्षभेद विसरून दिलखुलास चर्चा केली. अनिल परब – तुमच्या बद्दल मला विचारताहेत. आम्ही म्हटलं आम्ही दोघे मिळून उत्तर देतो. नीलम गोऱ्हे – फडणवीसांनी चांगलं समजून सांगितलं. अनिल परब – हो, मला चांगलं समजलंय. निलम गोऱ्हे – सगळ्यांना सहकार्य करणं माझं काम आहे. अनिल परब – आज जसं सहकार्य दिलं तसं नेहमी द्या.
News18लोकमत
15 दिवसांचं पावसाळी अधिवेश महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 17 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत पार पडत असून 15 दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, 17 जुलैपासून सुरु झालेलं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. तर अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होणार आहे. विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार, सरकारकडून उत्तरे कशी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.