मुंबई, 18 जुलै : आधारा कार्डबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध आहेत. राज्य सरकारनं विधान परिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. राज्य सरकारने विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरले आहेत. तर 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहेत. ‘विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही’ दरम्यान यावेळी बोलताना मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे की, जरी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले असले तरी त्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही. या विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळून देण्यासाठी यंत्रण देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अधिवेशनाचा दुसरा दिवस आज अधिवेशनाचा दुसरा दिवस अपेक्षेप्रमाणे दुसरा दिवस वादळी ठरत आहे. विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :