ट्रेन चुकू नये म्हणून केली घाई, 6 विद्यार्थ्यांना मृत्यूने गाठलं; घटना CCTVत कैद


सुनील घरत, ठाणे, 18 जुलै : मुंबई नाशिक महारमार्गावर खडवली फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यात खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव ट्रेलरने काळी पिवळी ट्रॅक्सला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघतात 6 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेसुद्धा दाखल झाले.
गडकरींच्या धमकीमागे आरएसएस कनेक्शन; मास्टरमाईंड अफसर पाशाचा धक्कादायक खुलासा

पडघे इथून रेल्वेने जाण्यासाठी जीपमधून विद्यार्थी जात होते. त्यांची ट्रेन चुकू नये यासाठी जीप चालकाने अती घाई केली. या घाईतच समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरची जीपला धडक बसली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी पडघा इथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहनांपैकी काळी पिवळी ट्रॅक्स ही प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुंबई – नाशिक महामार्गावर खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करताना ट्रेलरची धडक बसली. या धडकेनंतर ट्रॅक्स ६० फूट दूरपर्यंत फरफटत गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *