मुंबई, 17 जुलै : अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्याचे पहिलेच विधानसभा अधिवेशन सुरू झालं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदारांनी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर बैठकीत काय झालं? याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले प्रफुल पटेल? राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाली. तब्बल 32 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवार यांची मनधरणी केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. आम्ही आज इथं आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल ज्याप्रमाणे विनंती केली. तशीच विनंती आज केली. पक्ष एकसंध राहावा यासाठी शरद पवार यांनी भूमिका घ्यावी. काल ज्याप्रमाणे त्यांनी आमचं ऐकून घेतलं. त्याप्रमाणे आजही शरद पवार यांनी ऐकून घेतलं असल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. वाचा –
निलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढ; ‘मविआ’च्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भे
ट दरम्यान, शरद पवार यांना या भेटीची कल्पना नव्हती. शरद पवार आल्यानंतर 45 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासमोर दोनतीन आमदारांनी निवदने दिली. शरद पवार यांनी सर्व ऐकून घेतलं. “इतके दिवस आपण भाजपविरोधात बोललो, काम केल, आता मला रस्ता दिसत नाही”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.
News18लोकमत
रविवारीही घेतली होती पवारांची भेट काल रविवारी अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती दिली की, ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.