सर्व आमदार का गेले शरद पवारांच्या भेटीला? दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं कारण…


मुंबई, 17 जुलै : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सर्व आमदार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदार भेटायला का पोहोचले याबद्दल माहिती दिली आहे. अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार यशवंत चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. याबद्दल दिली वळसे पाटील यांना विचारले असता प्रतिक्रिया दिली.

News18लोकमत


News18लोकमत

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘असं आहे की, सर्व आमदार हे शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे सर्व आमदार हे भेटायला गेले. आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहोत. आमचे ते नेते आहे, ते कायम नेते राहणार आहे. आम्ही सगळे एकाच पक्षात राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. अशातच रविवारी अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. तर आज अधिवेशनाचं काम कामकाज संपल्यानंतर सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सर्व आमदार दाखल झाले आहे.
(sharad pawar : मोठी बातमी, अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला)
काल रविवारी अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती दिली की, ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *