वैभव सोनवणे, प्रतिनिधी मुंबई, 17 जुलै : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अधिवेशनाच्या दिवशी घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार अचानक आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी यशवंत चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रविवारीच अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता त्यानंतर आमदारही भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. एक गट अजित पवार यांच्या बाजूने आहे तर दुसरा गट हा शरद पवार यांच्यासोबत आहे. पण अजूनही कुणाच्या बाजूने किती आमदार आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. अशातच रविवारी अजित पवार आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. तर आज अधिवेशनाचं काम कामकाज संपल्यानंतर सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सर्व आमदार दाखल झाले आहे.
News18लोकमत
काल रविवारी अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती दिली की, ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.