आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचंही लोकेशन करता येणार ट्रॅक; प्रवाशांना मोठा दिलासा

[ad_1]

छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै, अविनाश कानडजे : लालपरी अर्थातच एसटी बसचा सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार असतो. दररोज हजारो प्रवासी एसटी बसनं प्रवास करतात. स्वस्त आणि सुरक्षीत प्रवास अशी एसटी बसची ओळख आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीमध्ये अनेक बदल केले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे. ती म्हणजे आता रेल्वेप्रमाणेच घरबसल्या एसटी बसच्या लोकेशन ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या ॲपची चाचपणी सध्या सुरू आहे. सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.  आज घडीला या सुविधेची चाचणी सुरू असून, यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून सुमारे 550 बसेस विविध मार्गावर धावतात, या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *