मुंबई, 16 जुलै, विनोद राठोड : काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. संधी कोणाला मिळणार? काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानंतर काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातच आता सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! आणखी एक पक्ष फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ!
प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले कायम दरम्यान दुसरीकडे नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे गटनेते राहणार आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :