एसटी अपघाताची मालिका सुरूच; मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात


नवी मुंबई, 16 जुलै, प्रमोद  पाटील :  एसटी बसच्या अपघाताची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा मुंबई- गोवा महामार्गावर एसटीचा भीषण अपघात घडाला आहे. हा अपघात पनवेलमधील तारा गाव ब्रिजवर घडला आहे. मागून आलेल्या एसटी बसनं दोन चारचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनात प्रवासी होते, मात्र सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या प्रकरणात  एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई- गोवा महामार्गावर पेणच्या दिशेने जाणाऱ्या दोन वाहनांना एसटीनं मागून धडक दिली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र अपघातग्रस्त वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणात  एसटी बस चालक तात्या पवळ यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियंत्रण सुटल्यानं अपघात  मुंबई- गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. एसटीनं मागून दोन वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. वाहनांंचं मोठं नुकसान झालं आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *