[ad_1]
मुंबई, 15 जुलै : तुम्ही जर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडू शकते. तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या प्रभावशाली (Influencer) व्यक्तीला फॉलो करत असाल, तर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवाताना सावधगिरी बाळगा. कारण अशा आंधळ्या विश्वासाने लाखो रुपयांचा चुना लागू शकतो. इंस्टाग्रामवर अशाच प्रकारची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये काही प्रभावशाली लोकांचा समावेश होता. जे व्हिडिओ पोस्ट करून लोकांना आकर्षित करत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी पैसे गुंतवले आणि त्यांना लाखोंचा गंडा घातला गेला. काय आहे प्रकरण? एका व्यक्तीने मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला की Crypto_Anaisha नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका स्कीममध्ये, तुम्ही त्यात पैसे गुंतवल्यास, तुमची जमा केलेली रक्कम 30-35 मिनिटांत दुप्पट होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तुम्ही ही योजना रु.999 पासून सुरू करू शकता. या खात्याचा प्रचारही अनेक मोठ्या प्रभावशाली व्यक्तींनी केला होता. हे पाहून मुंबईतील एका व्यक्तीने 75 हजार रुपये जमा केले आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या गुन्ह्याची नोंद केल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास केला आणि मुख्य आरोपी मोहम्मद हमजा झाकी अन्वर याला कोलकाता येथून अटक केली, जो Crypto_Anaisha Instagram वर सायबर फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता. वाचा –
मृत पत्नीला न्याय देण्यासाठी कोर्टात जाणाराच निघाला खरा आरोपी; 17 वर्षांनी अटक मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकारे आरोपीने मुंबईत आतापर्यंत 30-35 जणांना आपल्या फसवणुकीचे शिकार बनवले आहे. सोशल मीडियाचे अनेक बडे लोक यात सहभागी असून ते या क्रिप्टो योजनेत गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मानसी सुरवसे, अक्षय अथरे आणि अंकिता भगत या तिघांवरही आरोपी केले आहेत. तिघांचेही इंस्टाग्रामवर सुमारे 10 लाख फॉलोअर्स आहेत. या योजनेच्या जाहिरातीचा व्हिडिओ पाहून अनेक लोक त्यात अडकले. पैसे गुंतवले आणि फसवणुकीचा बळी ठरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी या इन्फ्लुएन्सरला मुख्य आरोपीच्या वतीने पैसे देण्यात आले होते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपींकडून 11 मोबाईल जप्त केले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणखी किती जणांना सायबर फसवणुकीचे बळी बनवले गेले आहे, याचा शोध घेतला जात आहे. ही टोळी इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर कशा प्रकारे पैसे देत होती, त्याचाही पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link