विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 15 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. काय म्हणाले कृषिमंत्री धनंजय मुंडे? मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, की कृषिमंत्र्याची माझ्यावर जबाबदारी दिली. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं वेगळं नातं आहे. शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगलं करता येईल. आज माझा वाढदिवस आहे, तर मला आगळावेगळा आनंद आहे. मी पहिल्यांदा कृषि मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे. त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली. वाचा –
‘…म्हणून एकनाथ शिंदेंना आणलं आहे’, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल आता मागेल त्याला शेततळे आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
News18लोकमत
पर्जन्यमान जसे लांबलंय तसं या पुढच्या काळात आता लांबायला नको. किती ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे, या अनुषंगाने पण चर्चा करण्यात आलेली आहे. एक रुपयाची विमा योजना दिली आहे. विमा योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा. जर हमीभावापेक्षा जास्त रेट जर मिळत असेल तर कुणालाही नाराज व्हायचं कारण नाही. टॅमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलन केलीत. जर एखाद शेतकऱ्याला टॅमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या अनुषंगाने राजकारण होऊ नये. एक महिना टॅमेटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असा टोला अभिनेता सुनिल शेट्टी याला लगावला. बोगस बियाणे कुठल्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायलाच नको. जर कोणी बोगस बियाणे विकत असेल तर कृषी खाते त्यांचा बाजार उठवेल. पर्जन्यमानाची परिस्थिती पाहताना कुठे कमी पडतो. कुठे जास्त पडतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं असं शासन बघेल, असं आश्वासनही धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :