मुंबई, 15 जुलै : महाराष्ट्रातल्या मातीमधील अस्सल खेळ म्हणजे कबड्डी. कबड्डीच्या प्रसारासाठी बुवा साळवी यांचे मोठे योगदान होते. कबड्डीसाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बुवा साळवी यांचा स्मृतीसाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस महाराष्ट्र कबड्डी दिन साजरा केला जातो.
मुंबईतील
कामगारांची वस्ती असलेला कुर्ला-चुनाभट्टी हा परिसर कबड्डी, खोखो यासारख्या मैदानी आघाडीवर आहे. कबड्डी दिनानिमित्त कुर्ल्यातील सर्वात जुन्या कबड्डी टीमबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 88 वर्षांची परंपरा मुंबईतील जुन्या कबड्डी टीममध्ये कुर्ल्यातील अंबिका संघाचे मोठे योगदान आहे. या 88 वर्षांच्या प्रवासात अंबिका संघाने आजपर्यंत अनेक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू घडवले आहेत.आजही येणाऱ्या पिढीला कबड्डीचे प्रशिक्षण देऊन घडविण्याचे काम या संघातर्फे सुरू आहे. मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डीमध्ये अंबिका सेवा मंडळ या संघाला ओळखणार नाही असा एकही कबड्डीपटू नाही कारण की आजपर्यंत या संघाने हजारोच्या पारितोषिक पटकवून कबड्डीमध्ये एका वेगळ्या उंचीवर आपलं नाव कोरल आहे. या संघाच्या जडणघडणीमध्ये गडदे मास्तर यांचा सिंहाचा वाटा आहे.
News18लोकमत
अंबिका सेवा संघाचे प्रशिक्षक आणि सल्लागार ज्ञानेश्वर कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झाले तेव्हा पहिले तीन कॅप्टन हे अंबिका सेवा संघाचे होते. तेव्हापासून आजवर अनेक खेळाडू आमच्या मंडळानं घडवले आहेत. मी उपनगर टीमचा पहिलाकॅप्टन आहे. मुंबई उपनगर जिल्हा स्थापन झाला त्यावेळी अंबिका सेवा संघाच्या सात टीम खेळले होते.
नारळ पाणी पिऊन केला सराव, डोंबिवलीच्या इशाचा इंडोनेशियात सिल्व्हर पंच!
या मंडळाकडून संभा भाले, मधु पाटील, वसंत सुत, शेखर शेट्टी, चंद्र कोंढाळकर, असे अनेक मातब्बर खेळाडू महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्याचबरोबर कस्टम, रेल्वे, पोलीस, एअर इंडिया, रिझर्व्ह बँक, देना बँक अशा अनेक व्यावसायिक टीममधून आमचे खेळाडू खेळले आहेत.’ ‘अंबिका सेवा मंडळ हे वेगवेगळ्या उपक्रमाच्या अंतर्गत नवीन खेळाडू घडवण्याचं काम करत असतं. त्यासाठी आम्ही दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येतं. या शिबिरातील प्रत्येक खेळाडू चमकेल असं नाही पण जो खेळाडू चमकतो त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं मत मंडळाचे कार्यध्याक्ष किशोर काटकर यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.