बाबांनी तिच्या स्वागतासाठी…, सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा किस्सा केला शेअर


मुंबई, 14 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर प्रतिभा पवार यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी अनमोल अशी भेट प्रतिभा पवार यांना दिली. प्रतिभा पवार यांच्या खोलीत शरद पवार यांनी सुंदर अशी फुले ठेवली होती, त्याचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करताना म्हटलं की,‘सुंदर अशी अनमोल भेट…! आम्ही आईला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आलो तर बाबांनी तिच्या स्वागतासाठी हि अशी सुंदर फुले ठेवली होती.’ प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचं म्हटलं जातंय. तर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
भुजबळांचा येवल्यातून शरद पवारांना टोला; म्हणाले, तुम्ही अशाच चुका करा म्हणजे…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आले होते. प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी ते दाखल झाले होते. अजित पवार यांनी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार हेसुद्धा होते. प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही त्यांच्या हाताशी संबंधित होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *