दिल्ली, 14 जुलै : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्यात आलं. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. मात्र पक्षाचं चिन्ह गमावल्यानंतर देखील ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीयेत. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या चिन्हावर समता पक्षाकडून दावा करण्यात आला होता. समता पक्षाकडून सुप्रीम कोर्टात धाव समता पक्षाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी 17 जुलैरोजी होणार आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला जे मशाल चिन्ह दिलं आहे. ते आमच्या पक्षाचं चिन्ह असल्याचा दावा समता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता 17 जुलैला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
काय आहे निवडणूक आयोगाचा निकाल? गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला. त्यानंतर अनेक आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी बहुमताच्या आधारावर पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना नावावर दावा केला होता. निवडणूक आयोगानं दोन्ही गटाची बाजू ऐकूण घेतल्यानंतर उपलब्ध पुराव्याच्या आधारे शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला. सध्या उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र यावर देखील आता समता पक्षानं दावा केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :