मुंबई, 14 जुलै, अजित मांढरे : मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थमंत्रिपद मिळणार असल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह महायुतीमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी खातेवाटप की मंत्रिमंडळ विस्तार यावर महायुतीतील नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रिपद देण्यास शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र या सर्व प्रकरणावर आता अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर तोडगा निघाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीवारीत तोडगा? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार यांच्या दिल्ली वारीनंतर यावर तोडगा निघाला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र जरी अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळणार असलं तरी देखील त्यांना त्याबदल्यात काही महत्त्वाची खाती सोडावी लागणार आहेत. अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळाल्यास शिवसेनेच्या वाट्याला अधिकची मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.
Ajit Pawar : …म्हणून या सरकारमध्ये अजित पवारांना काम करणं अवघड होईल; खडसेंचं मोठं वक्तव्य
अजित पवार यांनी आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अद्यापही हे सर्व मंत्री खात्याविनाच आहेत. खातेवाटपाचा तिढा अर्थमंत्रिपदावरून आडला होता. अखेर यावर अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांनाच अर्थमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याबदल्यात अजित पवार यांना काही महत्त्वाची खाती सोडावी लागणार आहेत. ही मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :