गणेश गायकवाड, प्रतिनिधी ठाणे, 13 जुलै : राज्यात ठाकरे गट आणि भाजप यांच्यामधील वाद थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नेमकं काय ठरलं होतं? यावर दोन्हीकडून दावेप्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीर पुन्हा एकदा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी ठाकरे गटावर टीका करत बैठकीत काय ठरलं याचा थेट तपशीलच दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून प्रदेश भाजपाने आज विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये ही कार्यशाळा सुरू असल्याची माहिती आहे. या ठिकाणी बोलताना फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराज आहे. याच विषयावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला सुरुवात केली. फडवणवीस म्हणाले, नव्या सरकारला एक वर्ष झालं, आपल्याला सरकारमध्ये नवा सहकारी मिळाला आहे. आनंद, कुतूहलासोबत अनेक प्रश्न कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मनात आहेत. कधीतरी देशाकरिता मेहबुबा मुफ्तीसोबत जावे लागले. पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणे बाकी आहे. महाविजयाकरता कडू औषध घ्यावं लागलं तरी चालेल. आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत. 2019 साली भाजप आणि सेनेच पूर्ण बहुमत आलं. मला दुःख आहे. काही लोक शपथ देखील खोटी घेतात. पोहरा देवीला जाऊन त्यांनी खोटी शपथ घेतली असेल, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. फडणवीसांनी सांगितला तपशील पुढे फडणवीस म्हणाले, युतीची बोलणी सुरू होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अमित शाहंशी फोनवर बोललो. ठाकरे यांचं म्हणणं आहे काही काळ आम्हाला मुख्यमंत्री हवं आहे. मात्र, शाह यांनी सांगितलं मुख्यमंत्री भाजपचा होईल. मंत्री पद जास्त घ्या. ठाकरे म्हणाले हे होणार नसेल तर युती होणं कठीण आहे. तीन दिवसांनंतर एक मध्यस्थी आले. ते म्हणाले ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला आहे. पालघरच्या जागेची मागणी केली. पालघरची जागा द्या, आपण अनेक वर्ष युतीत आहोत, असा निर्णय झाला. बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शाह, मी, उद्धव ठाकरे एकत्र होतो. पत्रकार परिषदेत काय बोलायचं याची तालीम झाली. मग वहिनी आल्या. उद्धव म्हणाले त्यांच्यासमोर बोलून दाखवा. मी तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो. त्यावेळी उद्धवजी अनेकदा म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र यांना करायचं आहे. मात्र, नंबर आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं. आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. त्यानंतर काय झालं तुम्हाला माहीत आहे. वाचा –
‘दिल्लीपुढे सह्याद्री कधी झुकला नाही, पण दिल्लीवाऱ्या पाहिल्या तर..’ रोहित पवारांचा रोख कुणाकडे? राष्ट्रवादीशी राजकीय युती सातआठ दिवसांनी हे आपल्याला गुंडाळतात हे लक्षात आलं. मग अजित दादांसोबत जे केलं ते ठरवुन केलं. मात्र, 19 साली गद्दारी केली. पाठीत खंजीर खुपसला. हा खंजीर देवेंद्र यांच्या पाठीत नाही, तर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपने उद्धव ठाकरे यांचे लोक निवडून यावेसाठी मेहनत घेतली. हा धर्म आहे, अधर्म नाही. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनीती करावी लागेल. लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडला, घरं फोडली. मात्र, माझा सवाल आहे 2019 साली सुरुवात कोणी केली. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल. शिवसेनेशी इमोशनल मैत्री आहे. राष्ट्रवादीशी युती ही आमची राजकीय मैत्री आहे. मात्र, 10 ते 15 वर्षांत राष्ट्रवादीशी इमोशनल मैत्री होईल.
News18लोकमत
मोदीजींनी गरिबी कमी केली. सगळे लोक मोदींजींच्या विरोधात एकत्र येतात. आमचे दरवाजे खुले आहेत. काँग्रेस, एमआयएम नको. आज कोणी आमच्याकडे येत असेल दरवाजे खुले आहेत. उद्धव ठाकरे असे का बोललात? कारण त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. कलंक म्हणू देत, जो नेता मनातून पराभूत होतो. तो कधी विजयी होत नाही. मी कोणाला काही म्हणत नाही. मी संजय राऊत नाही. 19 ची उत्तरे 2023 ला मिळाली. 23 ची 26 ला मिळतील. 152 हा आकडा बवणकुळेंमुळे आला का माहीत नाही? आपल्यालाही निवडून यायचं आहे, मित्रांनादेखील निवडून आणायचे आहे. आमच्या नेत्यांनी सांगितलं. शिवसेनेला सोडणार नाही, असंही शेवटी फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.