मुंबई, 13 जुलै : ऑनलाइन गेमच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर पाकिस्तानमधून नोएडात आलेली महिला सीमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नोएडातील तरुणावर पाकिस्तानमधील महिलेचा जीव जडला. त्यानंतर प्रेमाखातर महिला चार मुलांसह नोएडात पोहोचली. यानंतर आता २७ वर्षीय महिला सीमा हैदर हिच्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मुंबईच्या ट्राफिक पोलीस कंट्रोल रूमला धमकी देणारा एक फोन आला आहे. जर सीमा हैदर पाकिस्तानमध्ये परतली नाही तर भारताचा नाश होईल असं विधान कॉल करणाऱ्याने उर्दू भाषेत केलं. २६/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार रहा आणि यासाठी उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. हा कॉल १२ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आला होता. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये परत न पाठवल्यास भारताचा विध्वंस होईल अशी धमकी कॉलरने दिलीय.
मुंबईत आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी! 8 कोटींची संपत्ती, तरी अजूनही मागतोय भीक
सीमा हैदर पाकिस्तानची असल्याचं उघड झाल्यानंतर तिच्यासह प्रियकर सचिन आणि त्याचे वडील नेत्रपाल यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिघांनाही या प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तर सीमाकडून मोबाईल फोन आणि पासपोर्ट जप्त केले आहेत. पजबी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांचा एकमेकांवर जीव जडला. त्यानंतर सीमा दुबई मार्गे नेपाळ आणि तिथून नोएडातील रबूपुरा इथं 13 मे रोजी पोहोचली. यानंतर सीमाने हिंदू धर्मही स्वीकारला. चार मुलांना घेऊन भारतात आलेली सीमा अवैधरित्या राहत असल्याने पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. भारतात घुसखोरी करण्यासाठी सीमा हैदरने युट्यूबवर माहिती शोधली. तिला जास्त काही समजलं नाही तेव्हा एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून नेपाळला जाण्याचे तिकिट काढले. त्यानंतर नेपाळमधून ती नोएडात आली आणि सचिनला भेटली. सीमाचा पती सध्या सौदी अरबमध्ये असून तिथे नोकरी करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :