पावसाने मनावर घेतलं; राज्यासाठी पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार


मुंबई, 13 जुलै : राज्यात उशिरा आगमन झालेल्या पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात पेरणी रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशात हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहिल तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील 1 ते 2 तास चांगला पाऊस होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 2 आठवडे (14 ते 27 जुलै दरम्यान)  महाराष्ट्रासह खानदेश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 2 आठवडे अनेक भागात चांगल्या पावसाची अपेक्षा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासांत जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा… पुढील 3-4 तासांत ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, पालघर, रायगड आणि कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस होईल, अशीही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. वाचा –
विदर्भाच्या नंदनवनात जमणार पर्यटकांचा मेळा! चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव लवकरच
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवार, 15 जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 16 व 17 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच 22 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *