1000 रुपयांचं फेस मसाजर फक्त 200 रुपयांना, मेकअपचं इतकं स्वस्त साहित्य कुठे?


मुंबई, 13 जुलै : मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडतं. फक्त मुलीच नव्हे तर पुरुष देखील मेकअप करण्यास पसंती देत असतात. मेकअप ही एक उत्तम कला असून एखाद्याचे शारीरिक स्वरूप सुधारण्यासाठीचे एक साधन आहे. महिलांना त्यांचे व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्यास, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मेकअप हा मदत करतो. प्रत्येकाची मेकअप करण्याची आवड आणि परिभाषा हे वेगळी असते. त्यामुळे मेकअप करण्यासाठी लागणारे साहित्य
मुंबईत
स्वस्त दरात कुठे मिळते याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कुठे कराल खरेदी? नॅचरल मेकअप आणि कमीत कमी मेकअप हा सध्या ट्रेंडिंगला आहे. त्यामुळे मेकअपसाठी लागणारे साहित्य हे तुम्ही मुंबईच्या क्रॉफर्ड मार्किट या ठिकाणी खरेदी करू शकतात. येथील शावण स्टोर हे कोस्मॅटिक्सचे दुकान असून येथे मेकअप संदर्भातील अनेक प्रकार अगदी स्वस्त होलसेल दरात उपलब्ध आहेत. शावण दुकानाचे व्यवस्थापक अजमल आलम हे आहेत.

News18लोकमत


News18लोकमत

कोणकोणते मेकअपचे प्रकार उपलब्ध ? शावण हे पूर्ण कॉस्मॅटिक्स शॉप असून या ठिकाणी मेकअप संदर्भातील अनेक प्रकार अगदी स्वस्त होलसेल दरात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्वतःचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय करायचा असल्यास हे दुकान नक्कीच एक उत्तम पर्याय ठरेल. शरीराच्या स्किन केअरसाठी लागणारे विविध क्रीम, स्क्रब, मास्क, शॅम्पू, तेल, टोनर अगदीच कमी दरात उपलब्ध आहे. त्याचबरोबर मेकअपसाठी लागणाऱ्या क्रीम, फाउंडेशन, पाउडर, इयेशॅडो, लिपस्टिक, ब्लश, प्रायमर, कॅन्सिलर, हायलाईटर, काँटर, काजळ, लायनर, मस्करा, सेटिंग स्प्रे, फिक्सर आणि हे प्रोडक्ट वापरण्यासाठी विविध ब्रश, स्पंज, ब्लेण्डर, मसाजर असे अनेक प्रकारचे मेकअपचे सामान या ठिकाणी उपलब्ध आहेत.

Thane News : वेगवगेळ्या ट्रेंडी टॉप्सची खरेदी करायचीय? 200 रुपयांमध्ये इथं आहे संधी, Video

किती आहे किंमत? शावण स्टोर हे होलसेल असून या ठिकाणी मिळणारे सामान हे स्वस्त दरात आणि योग्य त्या वैधता असलेले आहेत. या ठिकाणी लिपस्टिक ही फक्त 30 रुपयांत मिळते. ब्युटी ब्लेंडर हे 20 रुपयांत मिळते. वेगवेगळ्या शेडचे फाउंडेशन हे फक्त 50 रुपयांत मिळते. विविध आयशडो पॅलेट हे 70-110 या किमतीत उपलब्ध आहे. ऑनलाइन 1000 रुपयात मिळणारे वायरल फेस मसाजर या ठिकाणी फक्त 200 रुपयांत उपलब्ध आहे. मिनी लिपग्लॉस हे फक्त 10 रुपयात मिळते आणि मिनिक्युर – पेडिक्यूरचे सगळे सामान हे फक्त 80-100 या किमतीत या ठिकाणी उपलब्ध आहे, अशी माहिती अजमल आलम यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *