Union Cabinet News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी देण्यात आली. आता ते लवकरच संसदेतही मांडले जाऊ शकते. संसदेच्या या हिवाळी अधिवेशनातच केंद्र सरकार हे विधेयक आणू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. एक देश, एक निवडणुकीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला.