Jaipur Tanker Blast News in Marathi : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. अजमेर रोडवर सीएनजी टँकरचा स्फोट होऊन सुमारे ४० वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक वाहने भस्मसात झाली आहे. आतापर्यंत या घटणत ५ जणांचा जळून मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर जवळपास २५ जण गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजमेर रोडवरील भांक्रोटा भागात हा अपघात झाला. गॅस टँकरमध्ये झालेल्या स्फोटामुळे बस, ट्रक, कार सह पेट्रोल पंपासह अनेक वाहनांना आग लागली.