- Marathi News
- International
- Violence Again In Bangladesh, 55 year old Servant Tied Up And Murdered In Temple…, 4 Temples Attacked, Vandalized In 2 Days
ढाका19 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबत नाहीत. नातोर जिल्ह्यातील कासिमपुरा येथे शुक्रवारी रात्री उशिरा मंदिरातील सेवक तरुण दास (५५) यांची मंदिरात लुटीनंतर हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी भाविक मंदिरात पोहोचले असता सामान विखुरलेले दिसले. आत दास यांचा मृतदेह पडला होता.
वीस वर्षांपासून मंदिरात सेवा करणाऱ्या दास यांचे हातपाय प्लास्टिकच्या दोरीने बांधलेले होते. हल्लेखोरांनी दास यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केले. अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. येथील प्रमुख हिंदू संघटनेच्या जागरण जोतच्या कार्यकर्त्यांनीही याविरोधात निदर्शने केली. बांगलादेशात २ दिवसांत ४ मंदिरांवर हल्ले व मूर्तीची तोडफोड झाली.