Viral News : पत्नीला पोटगी देण्यासाठी एक टॅक्सी चालक ८० हजार रुपयांची नाणी घेऊन कोयंबटूर कोर्टात पोहोचला. न्यायालयाने पोटगी म्हणून त्याला दोन लाख रुपये भरण्यास सांगितले होते. कोयंबटूर येथील अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयात बुधवारी ही घटना घडली. न्यायालयाने पत्नीला अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले होते.