क्षेपणास्त्र हल्ल्यांमधून जीव वाचवत लेबनानी नागरिकांची सीरियात धाव: सीरिया सीमेवर लेबनाॅनच्या लोकांची गर्दी उसळली

[ad_1]

  • Marathi News
  • International
  • Lebanese Citizens Rush To Syria To Save Their Lives From Missile Attacks, Lebanese People Rush To The Syrian Border

वैभव पळणीटकर1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

‘मला पायी जायचे आहे. जास्त बोललो तर उशीर होईल. लवकर पोहोचावे लागेल. सीरियात एक ड्रायव्हर माझी वाट पाहत आहे.’ हा इशाम आहे. खांद्यावर बॅग घेऊन इशाम वेगाने चालत होता. इस्रायली हल्ल्यानंतर बेरूतमधील इशाम हा विद्यार्थी सीरियाला जात आहे. सीरियातील परिस्थिती चांगली नाही हे त्याला माहीत आहे, पण लेबनॉनमधील परिस्थिती त्याहूनही वाईट असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

इशाम एकटा नाही, त्याच्यासारखी शेकडो लोक, मुले, स्त्रिया क्षेपणास्त्र हल्ल्यांतून जीव वाचवण्यासाठी पायीच लेबनॉन-सीरिया सीमा ओलांडत आहेत. पायी यासाठी की इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला करून लेबनॉन आणि सीरियाला जोडणारा महामार्ग नष्ट केला. आम्हीसुद्धा कसेतरी लेबनॉन-सीरिया सीमेवरील अल मस्ना बॉर्डर चेक पॉइंटवर पोहोचलो. वाटेत तीन ठिकाणी आम्हाला थांबवले. रोखणारे गणवेशात नव्हते. विचारणा केल्यावर एक जण म्हणाला, इस्रायल किती विनाश घडवत आहे ते बघितले ना. जा, पण सावध राहा. येथे लेबनॉनच्या विविध शहरांतून येणाऱ्या लोकांना अडवून चेकपोस्टवर कागदपत्रे तपासली जात होती. तेथे काही लोक दिसले.

ड्रायव्हरने सांगितले की ते दलाल आहेत. त्यांच्याकडे शस्त्रेही आहेत. त्यांचे फोटो काढू नका, त्यांच्याशी बोलू नका. दरम्यान, एक लेबनीज सैनिक आमच्याकडे आला आणि म्हणाला, इस्रायलने हायवे उद्ध्वस्त केला आहे. तुम्ही तो कव्हर कराल का?’ सैनिक म्हणाला, जा, पण दहा मिनिटांत परत या. आम्ही इस्रायली हल्ल्यात उद्ध्वस्त महामार्ग पाहिला. त्यानंतर आम्ही चेकपोस्टवर परतलो. चेकपॉइंटवर गर्दी वाढत होती. एका गाडीतून ८-१० तंदुरुस्त लोक खाली उतरले.

आम्ही त्यांचे फोटो काढल्यावर त्यांनी डिलीट इट म्हणत जवळ येऊन फोटो आणि व्हिडिओ उडवले. यानंतर ते सीरियाच्या दिशेने निघाले. ते हिजबुल्लाहचे सैनिक होते. लेबनॉनमधून पलायन करत होते. आमचा ड्रायव्हर मोहंमद म्हणाला, देश सोडून जाण्याची वेदना असह्य आहे. पण आम्हा लेबनॉनच्या लोकांना दुसरा पर्याय नाही. या वेदना सहन करणे हे आमच्या नशिबातच आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *