Viral News : लग्न मंडपात घुसला बिबट्या! वधू वरानं धूम ठोकली; जिवाच्या आकांताने वऱ्हाडी मंडळींसह पंगतीमधील लोक फरार

[ad_1]

Leopard Entered the Wedding Ceremony: लखनौमध्ये बुधवारी रात्री एका युट्यूबरच्या लग्न समारंभात बिबट्या घुसला. या घटनेमुळे लग्नमंडपात मोठा गोंधळ उडाला. अवध चौकातून दुबग्गाकडे जाणाऱ्या हरदोई बायपासवरील बुधेश्वर येथील एमएम मॅरेज लॉन्स येथे हा विवाह सोहळा पार पडला. बिबट्याला पाहताच सर्वजण सैरावैरा पळू लागले.  कॅमेरामनने थेट पायऱ्यांवरून उडी मारली तर वधू-वराने जीव वाचवत धूम ठोकत कारमध्ये जाऊन आसरा घेतला. या घटनेची माहिती  वनविभागाला मिळताच त्यांचे पथक लग्नमंडपात दाखल झाले.  यानंतर संपूर्ण लग्नमंडप रिकामे करून टेरेसवर लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद केलं.  

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *