Gurugram Crime News : व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे घटनेमुळे खळबळ उडाली. गुरुग्राम मधील एका नामांकित रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला होती. रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने अति दक्षता विभागात महिलेसह दृषकृत्य केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच शोध सुरु केला होता. तब्बल 80 CCTV फुजेट तपासून पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी शोधून काढला आहे.
पीडीत महिला ही एअर हॉस्टेस म्हणून काम करते. मूळची पश्चिम बंगालची राहणारी ही महिला एका कंपनीत एअर होस्टेस आहे. ती कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती. पीडितेच्या जबाबावरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
दरबारीपूरजवळ या महिलेचे एक महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर-15 येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी हॉटेलमधील स्वीमिंगपुल मध्ये ती पोहण्यासाठी गेली होती. मात्र, तिला अचानक अस्वस्थ वाटल्याने ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र, तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या रुग्णालयातच महिलेसह धक्कादायक घटना घडली.
6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता ही महिला व्हेंटिलेटरवर होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, ही महिला घरी परतली, तेव्हा तिने तिच्या पतीला या घटेनबाबत सांगितले. 14 एप्रिल रोजी पतीने 112 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासल्यानंतर 8 पोलिस पथकांनी आरोपींना अटक केली. लैंगिक छळाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, गुरुग्रामचे पोलिस आयुक्त विकास कुमार अरोरा आयपीएस यांनी एक विशेष पोलिस पथक स्थापन केले आणि आरोपींना ओळखून अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, गुरुग्राम येथील पोलीस उपायुक्त डॉ. अर्पित जैन आयपीएस यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये एकूण 8 स्वतंत्र पोलीस पथकांना विशेष सूचना देण्यात आल्या आणि वरील आरोपाशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी तैनात करण्यात आले. आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.