भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत काँग्रेस नेत्याचा मृत्यू, वहिनी गंभीर; सरपंच पदाची निवडणूक हरला होता आरोपी


छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात एका स्थानिक भाजप नेत्याच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका स्थानिक काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला, तर त्याची वहिनी जखमी झाली. डोगरी गुडा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात काँग्रेस नेते हेमंत भोयर यांचा मृत्यू झाला, तर त्यांची वहिनी जखमी झाली. ज्या भाजप नेत्याच्या गाडीला अपघात झाला, त्याने सरपंचपदाची निवडणूक लढवली होती, पण काँग्रेस नेत्याच्या वहिनीकडून त्यांचा पराभव झाला. पंचायत निवडणुकीतील पराभवानंतर वैमनस्यातून भोयर यांची भाजप नेत्याने हत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. अपघातानंतर पोलिसांनी आरोपी भाजप नेते पुरेंद्र कौशिक याला ताब्यात घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *