[ad_1]
- Marathi News
- National
- Pakistan Was Shattered By India’s Attack; Targeted Civilians In Indian Villages, Shelled Settlements, Spent The Night In Bunkers In Villages Along The LoC; 24 hour Aerial Surveillance On The Rajasthan Border
मुदस्सीर कुल्लू13 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पाकिस्तानचे लष्कर गेल्या १२ दिवसांपासून सतत एलओसीवर गोळीबार करत होते. ऑपरेशन सिंदूरनंतर ते जास्तच बिथरले आहे. १३ व्या रात्री पाकिस्तानने एलओसीवरील भारतीय गावांना लक्ष्य केले. ज्या गावांमध्ये बंकर होते, तेथील लोक आधीच मंगळवारी संध्याकाळी बंकरमध्ये गेले होते. मात्र, जिथे बंकर नव्हते, तिथे लोकांना संपूर्ण रात्र भीतीत घालवावी लागली. पाकने पंूछ, राजौरी, बारामुल्ला, रियासी, कुपवाडा जिल्ह्यांतील मेंढर, खनेतर, इरविन, कृष्णा खोरे, शाहपूर, मनकोट, लाम, मंजाकोट, गंभीर ब्राह्मणा, सलामाबाद, उरी, तंगधार या गावांना लक्ष्य केले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोकांना घर सोडून पळावे लागले.
उत्तर काश्मीरच्या नौपोरा उरीतील ४० वर्षीय बदरुद्दीन म्हणाले की, पाककडून पहिल्यांदाच एवढा गोळीबार झाला. गोळीबाराच्या वेळी मी पत्नी व दोन मुलांसोबत झोपलो होतो. अचानक मोठा आवाज आला. आमच्या गावात बंकर नाहीत, त्यामुळे आम्ही घरातच अडकून पडलो. तेव्हा एक गोळा थेट छतावर पडला, ज्यामुळे घराचे नुकसान झाले. मी आणि माझा ८ वर्षांचा मुलगा जखमी झालो. काही वेळातच पोलिस आले आणि आम्हाला रुग्णालयात नेले. नौपोऱ्याचे बशीर अहमद यांनी सांगितले की, आमच्या गावातील सर्व ६० घरांचे काही ना काही नुकसान झाले आहे.
बिहार: भारत-नेपाळ सीमेवर १५ किमी आतपर्यंत झडती
ऑपरेशन सिंदूर नंतर नेपाळला खेटून भारताच्या ६०० किमी लांब सरहद्दीलगतच्या भागात बुधवारी शुकशुकाट होता. जवान ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची झडती घेत होते. प्रत्येक संशयिताची ओळख पटवली जात होती. डोळ्यातील रेटिनाचीही तपासणी केली जात होती. पाकची गुप्तचर संस्था आयएसएआयचे भूमिगत हस्तक घुसखोरी करु नये म्हणून कडक निगराणी ठेवली जातआहे. नेपाळ सीमेहून आत १५ किमीपर्यंत एसएसबी ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करीत होती. इतर वेळी फक्त सरहद्दीवर संशयित वाटणाऱ्या लोकांची तसेच साहित्याची तपासणी केली जाते.
बंगाल व ईशान्येतही लष्कर सज्ज, सीमांवर निगराणीत वाढ
कोलकाता.ईशान्य भारतातील आंतरराष्ट्रीय सीमांवर १० दिवसांपासून अतिरिक्त तुकड्यांची तैनाती सुरू आहे. लष्कराच्या पूर्व कमान मुख्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील तेजू येथील सेनेच्या तळावरून आठवड्यापूर्वीच अतिरिक्त तुकड्या दुर्गम भागात पाठवल्या. यासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच लष्कराच्या मुख्यालयातून आदेश मिळाले होते. बांगलादेश सीमेजवळील प. बंगाल बॉर्डरवरही तैनाती वाढवली आहे. सिलिगुडी येथे तैनात बीएसएफच्या नॉर्थ बंगाल फ्रंटियरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेश सीमेजवळ जवानांची तैनाती दुप्पट केली आहे.
राजस्थान : पश्चिम सीमेचे ५ हवाई तळ हाय अलर्टवर, संरक्षण प्रणालीही सक्रिय
देशाच्या पश्चिम सीमेवर बीएसएफ आणि हवाई दलाने गस्त वाढवली आहे. पश्चिम क्षेत्रातील पाचपेक्षा जास्त हवाई तळांवरून लढाऊ विमानांची उड्डाणे सुरू आहेत. रात्रीच्या मोहिमेनंतर पश्चिम क्षेत्रात विमानांची गर्जना होती. सकाळी सहा वाजेपर्यंत विमाने लँड झाली होती. सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा उड्डाणे सुरू झाली. जोधपूर, उत्तरलाई, जैसलमेर, नाल, फलौदी येथून दोन दिवसांसाठी जारी नोटम अंतर्गत युद्धाभ्यास सुरू आहे. सुखोई-30 एमकेआय विमाने घातक शस्त्रास्त्रांसह गंगानगरपासून कच्छपर्यंत टेहळणी करत आहेत. प्रमुख शहरांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. जैसलमेर, गंगानगर, बाडमेर आणि बिकानेर येथील शाळा १० मेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. जोधपूरसह संवेदनशील सिव्हिल एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे ९ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. बीएसएफ राजस्थान फ्रंटियरचे आयजी एमएल गर्ग म्हणाले, सरहद्दीवरील गावे रिकामी करण्यात आलेली नाहीत. युद्धाच्या भीतीपेक्षा ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे.
जम्मू विभागातील पूंछमध्ये जास्त नुकसान झाले. येथे अनेक घरे, इमारती मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या. ९ सामान्य नागरिकांचा मृत्यू तर २८ जखमी झाले. येथे मनकोट भागातील संजय सिंह यांनी सांगितले की, रात्री सुमारे २ वाजता घराजवळ गोळे पडले. एका गोळ्याच्या छर्ऱ्यामुळे त्यांच्या चुलत बहिणीचा मृत्यू झाला. माझ्या भावाचे घरही पडले. अजूनही न फुटलेल्या गोळ्यांचे अवशेष चारही बाजूंनी विखुरलेले आहेत. राजौरीच्या मेंढरमधील आदिल अहमद यांनी सांगितले की, युद्धासारखी रात्र होती. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी पळत होता. गोळीबार सुरू होताच बंकरमध्ये गेलो. कुपवाडाच्या तंगधार येथील बशीर अहमद म्हणाले,की, मध्यरात्री ६ किमी दूर एका नातेवाइकाच्या घरी गेलो. येथे पाकच्या गोळीबारात १० जखमी झाले. कुपवाडाच्या कर्णाहमध्ये लोकांनी बंकरमध्ये रात्र घालवली.
[ad_2]
Source link