[ad_1]
Dire Wolf: 1300 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्याच्या प्रजातीचा पुन्हा जन्म झाला आहे. डायर वूल्फ म्हणजेच डायर लांडगा ही प्रजाती पृथ्वीवरुन नामशेष झाली होती. मात्र अमेरिकेतील टेक्सासमधील कलोसल बायोसायन्सेस या जैव-अभियांत्रिकी कंपनीमुळं हे लांडगे पुन्हा एकदा पृथ्वीवर परतले आहेत. या दोन नर आणि एक मादी असे एकूण तीन लांडग्यांनी पुन्हा जन्म घेतला आहे. पण कसं शक्य झालं? हे जाणून घेऊया.
एखादी प्रजाती नामशेष होते याचा अर्थ असा की त्या प्रजातीतील एकही प्राणी या पृथ्वीतलावर सध्या अस्तित्वात नाही. नर आणि मादी दोघेही अस्तित्वात नसताना या तीन लांडग्यांनी जन्म कसा घेतला असेल, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना. या मागे विज्ञानाचा चमत्कारच म्हणता येईल. विज्ञानामुळं या तीन लांडग्यांचा जन्म होऊ शकला आहे. कंपनीने काय केले, हे जाणून घ्या.
कंपनीने 1300 वर्षापूर्वीचा डायर लांडग्याचा दात घेतला. दुसऱ्या एका जीवाश्मातून 72,000 वर्षापूर्वीच्या डापर लांडग्याची कवटी घेतली. दातातून आणि कवटीतून त्यांनी या लांडग्याचा संपूर्ण डीएनए मिळवला. हे महाकर्मकठीण काम आहे. या डीएनएच्या संपूर्ण संचाला जिनोम म्हणतात. डीएनए हा एडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, थायमाइन या चार न्युक्लिटाइडना विशिष्ट क्रमाने जोडून बनलेला असतो. हा विशिष्ट क्रम शोधून काढणे म्हणजेच जिनोम सिक्वेन्सिंग करणे. हा क्रम म्हणजे त्याच्या प्रजातीची जिनोम कुंडलीच असते.
डायर लांडगा हा श्वान कुळातील प्राणी. सद्या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या, वावरणाऱ्या कोणत्या श्वान कुळातील प्राण्यांशी डायर लांडग्याचा जिनोम किंवा डीएनए चांगल्यापैकी जुळतो आहे ते पाहिले. राखाडी लांडग्यांची प्रजाती डायर लांडग्यांच्या प्रजातीच्या अगदी जवळची नातेवाईक आहे हे त्यांच्या लक्षात आले. कारण या दोघांच्या डीएनए मध्ये 99.5 टक्के साम्य आढळले! म्हणून राखाडी लांडग्याच्या पेशी (रक्तातील एपिथेलियल प्रोजनायटर सेल्स) वापरायचे त्यांनी ठरवले. या पेशी प्रयोगशाळेतदेखील वाढवता येतात.
डायर लांडगे हे राखाडी लांडग्यांपेक्षा मोठे, बलाढ्य, जास्त शक्तिशाली होते. डायर लांडगे जवळजवळ साडेतीन फूट उंच आणि सहा फूट लांब असावेत. त्यांचे वजन 70 किलो पर्यंत असेल. बर्फाळ प्रदेशात तग धरून राहण्यासाठी त्यांच्या अंगावर लांब दाट केस म्हणजेच पांढऱ्या रंगाची फर होती. त्यांचा जबडा मोठा आणि दणकट होता. पायांचे स्नायू अधिक शक्तिशाली होते. घोडे, जंगली बैल, मॅमथ अशा प्राण्यांचे ते मांस खात असत. अशा भक्ष्यांची संख्या कमी झाली. शिवाय माणसांनी केलेली शिकार. या दोन्ही कारणामुळे डायर लांडगे नामशेष झाले. डायर लांडग्याची ही जी काही गुणवैशिष्ट्ये होती ती कोणत्या जनुकांमुळे निर्माण झाली होती हे त्यांच्या जिनोमवरून शोधून काढले. राखाडी रंगाच्या लांडग्याच्या शरीरातून काढलेल्या पेशींमध्ये (रक्तातील एपिथेलियल प्रोजनायटर ऊन सेल्स) क्रिस्पर कॅस नाईन या जीन एडिटिंग तंत्रज्ञानाने काही जनुके एडिट करण्यात आली. त्यात की डायर लांडग्यासारखे बदल करण्यात आले.
थोडक्यात जिनोममध्ये शस्त्रक्रिया करून 14 जनुकांमध्ये 20 ठिकाणी नामशेष झालेल्या डायर लांडग्यासारखे बदल करण्यात आले. राखाडी लांडग्यामधून बिजांड-पेशी काढण्यात आली. या बीजांड-पेशीतील केंद्रक काढून टाकण्यात आला. त्यात वरीलप्रमाणे बदललेल्या पेशीतील केंद्रक घुसवण्यात आला. या तंत्रज्ञानाला सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर असे म्हणतात. या बीजांड-पेशीपासून प्रयोगशाळेत गर्भ तयार करण्यात आले. हे गर्भ कुत्र्याच्या गर्भाशयात सोडण्यात आले. डायर लांडगा, राखाडी लांडगा आणि कुत्रा हे एकाच श्वान कुळातील प्राणी आहेत. कुत्र्याच्या मादीचे गर्भाशय फक्त गर्भ वाढवण्यासाठी वापरण्यात आले होते. यथावकाश या सरोगेट कुत्र्याच्या मादीने पिलांना जन्म दिला. परंतु ती पिले कुत्र्याची नव्हती तर या डायर लांडग्याची होती. मूळ पेशी राखाडी लांडग्याची वापरून सुद्धा त्यात असलेल्या डायर लांडग्याच्या जनुकांमुळे त्याचे काही विशिष्ट गुणधर्म या जन्माला घातलेल्या लांडग्यांमध्ये प्रकट झाले. उदा. डायर लांडग्यासारखा मोठा आकार, शक्तिशाली स्नायू, शरीरावरील दाट पांढरे केस, केसांची लांबी इत्यादि.
मात्र काही शास्त्रज्ञांच्या याला तीव्र आक्षेप आहे. गाजावाजा करत जन्माला घातलेली ही पिल्ले खरोखरच डावर लांडग्याची आहेत का? राखाडी लांडग्याच्या जिनोम मध्ये पंधरा-वीस ठिकाणी वरवर दिसणाऱ्या शारीरिक गुणधर्मांमध्ये बदल केला की लगेच डायर लांडगा तयार होतो काय? ही वरवरची नसली तरी जिनोम स्तरावर केलेली रंगरंगोटीच आहे. राखाडी लांडग्याचा जिनोम 244.7 कोटी न्यूक्लिओटाईडनी बनलेला असतो डायर लांडगा आणि राखाडी लांडगार जिनोममध्ये ९९.५ टक्के साम्य आहे म्हणजेच ०५ टक्के फरकही आहे. याचाच अर्थ दोघांमध्ये लाखो न्यूक्लुटाइड्सचा फरक आहे. हे विसता कामा नये असे टीकाकार शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विपान्नरी आणि माणूस यांच्या जिनोम मध्ये १८.८ टक्के साधम्र्य आहे. म्हणजे चिंपान्झींच्या जिनोममध्ये पंधरा-वीस ठिकाणी बदल केले की तो माणूस होईल का? मग राखाडी लांडग्याच्या जिनोम मध्ये वीस ठिकाणी बदल केला म्हणजे डायर लांडगा तयार होईल काय? असा सवाल काही शास्त्रज्ञ प्रश्न करत आहेत.
[ad_2]
Source link