Operation Sindoor: परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला, काळ्या कारनाम्यांची यादीच सांगितली

[ad_1]

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळांना निशाण बनवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ गोळीबार करण्यात आला. यानंतर भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्यदलाकडून यासंदर्भात महिती देण्यात आली.

पाकिस्तानी सैन्य ठिकाणांना निशाणा बनवलं नव्हत. पण भारतीय सैन्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर दिलं जाईल, असंही म्हटलं होतं. पण पाकिस्तानने भारताच्या काही शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो निष्क्रिय करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र सचिवांकडून देण्यात आली. 

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. सीमेजवळी भागांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला गेला. यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने त्याच तिव्रतेने प्रतिक्रिया दिली. लाहोरमधील एअर डिफेन्स रडार निष्क्रिय करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *