[ad_1]
Operation Sindoor : 22 एप्रिल 2025 ला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावात दिवसेंदिवस वाढ होतोय. पहलगामचा बदला घेण्यासाठी 6-7 मे रोजी 2025 ला भारताने ऑपरेशन सिंदूर लँच केलं. ऑपरेशन सिंदूर अर्तंगत भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त भागातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानकडून 7-8 मे 2025 रोजी भारतातील 4 राज्यातील 15 शहरांना लक्ष्य करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ आणली. पाकिस्तानचा हल्ला भारताने उधळून लावला.
त्यानंतर ऑपरेशन सिंदूर अजून सुरु असून पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यात गुरदासपूरमध्ये रात्रीच्या वेळी पूर्णपणे ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले हे पहिले मोठे नागरी पाऊल आहे. या संदर्भात, गुरुदासपूरच्या उपायुक्तांनी आदेश जारी केला की, दररोज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॅकआउट असेल, या संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत हा ब्लॅकआउट सुरू राहणार आहे.
गुरुदासपूर प्रशासनाने रुग्णालय आणि मध्यवर्ती कारागृहाला ब्लॅकआउटमधून सूट दिली असली तरी, त्यांनाही त्यांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्या लागतील जेणेकरून आतील प्रकाश जाऊ नये. यावरून हे स्पष्ट होते की गुरुदासपूर जिल्ह्यात रुग्णालय आणि तुरुंग वगळता सर्वत्र अंधार असेल. सर्व रहिवाशांना आणि दुकानदारांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे आणि रात्रीच्या वेळी बाहेरील प्रकाश दिसणार नाही याची खात्री करण्यास सांगितले आहे.
गुरुदासपूरमध्येच का ब्लॉकआऊट?
गुरुदासपूर हा पंजाबमधील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. हा जिल्हा बियास आणि रावी नद्यांच्या मध्ये वसलेला आहे. पंजाबचा हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरशी संपर्कात राहतो. याशिवाय काश्मीरकडे जाणारा मुख्य रस्ताही येथून जातो. याशिवाय, येथून कांगडा खोऱ्याकडेही जाता येते. गुरुदासपूरमध्ये रणजित सागर (रावीवर) आणि पोंग धरण (बियासवर) अशी दोन मोठी धरणे आहेत, जी देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. म्हणून, हे ठिकाण सुरक्षित ठेवणे अनेक प्रकारे महत्त्वाचे आहे.
इतिहासातील एक महत्त्वाचा वळण!
17 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याच्या वेळी, गुरुदासपूर पाकिस्तानचा भाग होईल असे मानले जात होते. मात्र रॅडक्लिफने शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयात बदल आणि व्हाइसरॉय माउंटबॅटनने निर्णयाची विलंबित घोषणा केल्यामुळे, हे ठिकाण भारतातच राहणार आहे.
[ad_2]
Source link