India Pakistan war : घाबरट पाक सैन्य! भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्नात

[ad_1]

India Pakistan War : ऑपरेशन सिंदूर नंतर लगेचच पाकिस्तानने भारतातील अनेक भागात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर अचूक संयुक्त हल्ले केले. हल्ल्यांनंतर, अनेक उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकारी विमानतळावर विमानात चढण्याच्या घाईत दिसले. ज्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली.

ऑपरेशन सिंदूरनंतर, गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारतातील अनेक भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने पाकिस्तानच्या विविध प्रमुख शहरांवर संयुक्त हल्ले सुरू केले, त्यानंतर लगेचच अनेक पाकिस्तानी अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळाभोवती उच्चपदस्थ अधिकारी विमान पकडण्याचा प्रयत्न करताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर येताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली.

पाकिस्तानी अधिकारी पळून जाण्याच्या तयारीत 

अहवालानुसार, भारतीय हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता यामुळे पाकिस्तानी नेतृत्वात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामुळे काही अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये या घटनेच्या चर्चेमुळे राजकीय आणि लष्करी गटांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानच्या लोकांना या बातमीने काळजी वाटू शकते की जर त्यांचे उच्च अधिकारी युद्धात टाकून देश सोडून गेले तर त्यांचे संरक्षण कोण करेल?

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून हल्ला

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत हे सर्व ड्रोन अडवले आणि त्यांना पाडण्यात यश मिळवले. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला. असे सांगितले जात आहे की, पाकिस्तानची अनेक मोठी शहरे भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहेत. भारताच्या आयएनएस विक्रांत आणि राफेल सारख्या शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. हे वृत्त लिहिताना, भारतीय लष्कराने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *